Mhadei Water Dispute : म्हादई प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची दाट शक्यता !

म्हादई जलवाटप तंटा

पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) : म्हादई प्रश्‍नावर गोवा सरकारने प्रविष्ट केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर, तसेच म्हादई संदर्भात अन्य याचिका मिळून एकूण ५ याचिकांवर ३० नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकांवर २९ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी झाली नाही. त्यामुळे ३० नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी गोवा सरकारने पूर्ण सिद्धता केली असून महाधिवक्ता देवीदास पांगम यांच्या देखरेखीखाली १० अधिवक्त्यांचे पथक देहली येथे गेले आहे. म्हादई प्रश्‍नावर गोव्याच्या कर्नाटक सरकारच्या विरोधातील ३ याचिका, कर्नाटक सरकारची गोव्याच्या विरोधातील याचिका आणि महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या मुख्य अभियंत्याच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका मिळून ५ याचिकांवर एकत्रितरित्या सुनावणी घेतली जाणार असल्याने ही सुनावणी सतत २ किंवा ३ दिवस चालण्याची शक्यता आहे, असे मत महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कायद्याच्या दृष्टीने गोव्याची बाजू भक्कम ! – मुख्यमंत्री सावंत

कर्नाटक सरकारने आवश्यक ती अनुज्ञप्ती घेतल्याविदा म्हादई नदीवर कोणतेही बांधकाम करू नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आजच्या सुनावणीमध्ये हा विषय मांडला जाणार असून कायद्याच्या दृष्टीने गोव्याची बाजू भक्कम आहे. त्यामुळे या खटल्याचा निर्णय गोव्याच्या बाजूने लागणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.


‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा