|
नाशिक – मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटीशकालीन जुना रेल्वे पूल (ओव्हर ब्रिज) मध्यरात्री खचला असून २९ नोव्हेंबरच्या पहाटे त्याचा काही भाग कोसळला. यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र धुळे-शिर्डी मार्गावरील रेल्वेरुळावर हाच प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळला असून या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून, तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. यामुळे मनमाड शहराचे दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून चारचाकी गाडीही दुसर्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण झाले होते; मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. अभियंता संघटनेने वळण रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला; पण त्यासंदर्भातही पुढे काही घडले नाही. या पुलाचे दायित्व एम्.एम्.के.पी.एल्. या पथकर आस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाब्रिटीशकालीन पुलाच्या वापराची मुदत संपूनही त्याचा वापर अजूनही का केला जातो ? असा जनताद्रोही कारभार करणार्या संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक ! |