अकोला – येथील अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत भीमनगर चौक आणि कुरेशी चौक परिसरांत अवैध दारूच्या दुकानावरून दोन गटांत २० नोव्हेंबरच्या रात्री वाद झाला. या वेळी जोरदार दगडफेक झाली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
भीमनगर परिसरात एका मद्यपीने शिवीगाळ केल्याने तणाव निर्माण झाला होता. यानंतर दगडफेक झाली. या प्रकरणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.
संपादकीय भूमिकावारंवार होणारी हिंसक आक्रमणे आणि दगडफेक, म्हणजे राज्यात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचेच द्योतक ! |