नागपूर – सोयाबीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून सिंगापूर येथील एका व्यापारी दुर्गेशकुमार नागोरी यांची दीड कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सैगेरीस इम्पैसा या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. २१० मेट्रिक टन सोयाबीनची किंमत भारतीय चलनात १ कोटी ५६ लाख ८२ सहस्र ८८५ रुपये इतकी होती. आरोपींनी कराराप्रमाणे मालविक्री केल्यानंतर व्यापार्याला मालाची रक्कम देणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.