Firing in Mazgaon Mumbai : माझगाव (मुंबई) येथे दहशत पसरवण्यासाठी गोळीबार !

मुंबई – माझगाव येथील अफझल रेस्टॉरंट परिसरात १८ नोव्हेंबरच्या पहाटे ३ ते साडेतीनच्या सुमारास अज्ञाताने गोळीबार केला. सुदैवाने यात कुणीही घायाळ झाले नाही. गोळीबारामागील कारण समजू शकलेले नाही. दहशत माजवण्यासाठी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

  • मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा !
  • दहशत पोलिसांनी माजवायची असते; पण मुंबईतील चित्र सध्या उलटच आहे ! पोलिसांनी आतातरी स्वतःचा धाक निर्माण करावा !