महराजगंज (उत्तरप्रदेश) येथे श्रीलक्ष्मी-गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक मुसलमानांनी मशिदीसमोर रोखली !

पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवत ३ मुसलमानांना केली अटक !

महराजगंज (उत्तरप्रदेश) – येथे श्रीलक्ष्मी-गणेश यांच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला महंमदी गावातील मशिदीसमोर रोखण्याचा प्रयत्न झाल्यावर तणाव निर्माण झाल्याची घटना १३ नोव्हेंबरला घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कृती करत परिस्थिती नियंत्रणात ठेवत ३ जणांना अटक केली. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंदूंनी दिवाळीनिमित्त श्रीलक्ष्मी-गणेश मूर्तीची पूजा केली होती. त्यानंतर मूर्ती विसर्जन करण्यासाठी टॅक्टर ट्रॉलीतून नेली जात असतांना ही घटना घडली. मुसलमानांचे म्हणणे होते की, मिरवणूक दुसर्‍या मार्गाने नेण्यात यावी. यासह त्यांनी घोषणाबाजीही चालू केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान असल्याचे दिसत आहे. त्याखेरीज हिंदु ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतांनाही दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदुबहुल देशात मशिदीसमोरून हिंदूंची मिरवणूक नेण्यास विरोध करणारे निधर्मीवादी नाहीत, हे देशातील निधर्मीवादी राजकीय नेते आणि पुरो(अधो)गामी बोलण्याचे धाडस कधी करत नाहीत !
  • हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांना ज्या मशिदींच्या ठिकाणी जाणीवपूर्वक विरोध होतो आणि आक्रमण केले जाते, त्या मशिदी बुलडोजरने पाडाव्यात, अशी मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !