कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांची झुंडशाही !
ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये दिवसेंदिवस हिंदुद्वेष वाढत आहे. कॅनडातील मिसीसागा शहरात दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर खलिस्तानवाद्यांनी दगडफेक केली. या वेळी खलिस्तान्यांनी शांततेत दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर कचराही फेकत ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या. खलिस्तानींच्या या कृत्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. खलिस्तानवाद्यांनी दिवाळी साजरी करणार्यांना त्रास देण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
खलिस्तानवाद्यांनी ज्या भागात आक्रमण केले, त्या भागात मोठ्या संख्येने भारतीय हिंदु समाज रहातो. या प्रकरणी पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणावर परिसरातील स्थानिक नेत्यांनी टीका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. शहर प्रशासनाच्या सहकार्याने पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षीही खलिस्तानींनी दिवाळीच्या दिवशी हिंदूंवर आक्रमण केले होते.
कॅनडात हिंदु मंदिरांवरही होत आहेत आक्रमणे !
कॅनडात हिंदु मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. आता हिंदूंना दिवाळीही साजरी करायला न देणे,हे कॅनडातील वाढत्या असहिष्णुतेचे उदाहरण आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहेत. सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची हत्या केल्याचा आरोप केला होता. भारताने हा आरोप निराधार असल्याचे सांगत तो फेटाळून लावला आहे.
संपादकीय भूमिकाएकीकडे कॅनडा भारताची संबंध सुधारण्याची भाषा करत आहे, तर दुसरीकडे भारतविरोधी कारवाया करणार्या खलिस्तान्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे कॅनडाच्या या दुटप्पीपणाला भारत सरकारने कॅनडाला समजेल अशा भाषेत उत्तर दिले पाहिजे ! |