दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चारचाकी फोडून ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीची चोरी !;  इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या !…

चारचाकी फोडून ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीची चोरी !

डोंबिवली – मालेगाव (नाशिक) येथील काही कामानिमित्त कल्‍याण येथे आलेल्‍या नोकरदार तरुणींना कल्‍याणमध्‍ये चोरट्यांनी लुटले. हॉटेलात अल्‍पाहार करण्‍यासाठी गेलेल्‍या २ बहिणींची चारचाकी फोडून चोरट्यांनी त्‍यातील ३ लाख ६८ सहस्र रुपये किंमतीचा ऐवज चोरला. (कायदा-सुव्‍यवस्‍थेची दु:स्‍थिती ! – संपादक)


इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या !

विद्यार्थ्‍यांनो, संयम बाळगा !

ठाणे – अभ्‍यासाचा ताण सहन न झाल्‍याने बारावीतील एका विद्यार्थिनीने १४ व्‍या मजल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केली. कृतिका चव्‍हाण (वय १७ वर्षे) असे तिचे नाव आहे.


धर्मांध गुन्‍हेगारीत पुढे !

डोंबिवली – वेगाने दुचाकीवर येऊन नागरिकांना लुटणार्‍या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. वारीस खान (वय २४ वर्षे) आणि महंमद कुरेशी (वय ३० वर्षे) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. वारीस याच्‍यावर ९ गुन्‍हे नोंद आहेत.


मंदिरातील त्रिशूळ चोरणार्‍या चोराला पोलिसांकडून अटक !

कोतवाली (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – कोतवाली पोलीस ठाण्‍याच्‍या परिसरातून मंदिरातील चांदीच्‍या त्रिशूळाची चोरी करणार्‍या एका ४९ वर्षीय मनोरुग्‍ण चोराला कोतवाली पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (मंदिरातील चोर, मंदिरावर आक्रमण करणारा त्‍वरितच मनोरुग्‍ण कसा ठरवला जातो ? हे हिंदूंना पडलेले कोडे आहे. पोलिसांनी ते स्‍पष्‍ट करावे. – संपादक)

नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे त्‍यागपत्र !

नाशिक – आरक्षणाच्‍या मागणीसाठी मराठा समाजाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी स्‍मारकाजवळ ४८ दिवसांपासून साखळी उपोषण चालू आहे. या आंदोलकांना भेटण्‍यासाठी गेलेले शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना आंदोलकांनी जाब विचारत समाजासाठी त्‍यागपत्र देण्‍याची मागणी केली. त्‍यानुसार हेमंत गोडसे यांनी त्‍यागपत्र दिले असून ते मुख्‍यमंत्री शिंदे यांना सादर केले आहे.