काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात अद्याप वस्त्रसंहिता लागू नाही ! – न्यासाचे स्पष्टीकरण

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वेश्‍वर मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी ‘श्रीकाशी विश्‍वनाथ मंदिर न्यासा’चे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडेय यांनी २ दिवसांपूर्वी विधान केले होते. याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर न्यासाने स्पष्ट केले आहे की, अद्याप मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली नाही.

प्रा. नागेंद्र पांडेय यांनी सांगितले होते की, मंदिराच्या गर्भगृहासाठी संहिता बनवली पाहिजे. विवाहित महिलांना साडी आणि पुरुषांना धोतर अन् सदरा घालून येण्याचीच अनुमती दिली पाहिजे.