सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ नामजपामुळे साधकाला झालेले लाभ !

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करायला सांगितला. हा नामजप केल्यावर माझ्या मनाच्या स्थितीत पालट होऊन मला पुढील लाभ झाले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. नामजपादी उपायांच्या वेळी ‘माझे मन कुठे भरकटते’, हे माझ्या लवकर लक्षात येऊ लागले.

श्री. नितीन पांडे

२. माझे कोणत्याही प्रसंगात अडकण्याचे प्रमाण अधिक होते. ते न्यून झाले.

३. माझ्या उत्साहात वाढ झाल्यामुळे ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न आता मनापासून करावेत’, असे मला वाटत आहे. माझ्या मनाला उभारी मिळाली आहे.

४. माझी खाण्या-पिण्याची आवडही न्यून झाली आहे.

५. माझ्यातील ‘आग्रहीपणा’ ‘अतीचिकित्सकपणा’ ‘बहिर्मुखता’ आणि ‘साधकांविषयीचा पूर्वग्रह’, हे स्वभावदोष न्यून होऊ लागले आहेत.

६. माझी स्वेच्छा न्यून झाली आहे.

या नामजपामुळे माझ्यात पालट घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु मुकुल गाडगीळकाका यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज, जि. सांगली. (११.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक