|
अंकारा (तुर्कीये) – हमास ही आतंकवादी संघटना नसून ‘स्वत:ची भूमी आणि लोक’ यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना आहे, असे वक्तव्य तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगान यांनी केले. इस्रायलकडून चालू असलेल्या प्रतीआक्रमणाची बाजू घेणार्या पाश्चात्त्य देशांच्या विरोधात ते म्हणाले की, इस्रायलसाठी ढाळले जाणारे ‘पश्चिमी’ अश्रू हे फसवणुकीचे द्योतक आहे. तुर्कीयेचे परराष्ट्रमंत्री हाकन फिदान यांनी म्हटले की, इस्रायलने मानवतेची हत्या केली आहे.
सौजन्य द इकनॉमिक्स टाइम्स
यावर इस्रायलने प्रतिक्रिया व्यक्त केली की, एर्दोगान यांचे आतंकवादी संघटना हमासच्या संदर्भातील वक्तव्य आम्ही पूर्णपणे फेटाळतो. एर्दोगान यांचे शब्द हमासने केलेले क्रौर्य पालटू शकत नाहीत, संपूर्ण जगाने हमासचे क्रौर्य पाहिले आहे.
संपादकीय भूमिकाजगात जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्या पाकिस्तानचाच काश्मीरवर अधिकार असल्याचा सदैव पुरस्कार करणार्या इस्लामी तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षांकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करणार ? |