थिरुवनंतपुरम् (केरळ) – विजयादशमीनिमित्त ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) प्रमुख एस्. सोमनाथ यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा केली. या वेळी त्यांनी ब्रह्मांडाच्या रहस्यांविषयी चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून मी अंतराळातील रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करतो.’’
ईश्वराशी माझा विशेष संबंध ! – एस्. सोमनाथ
ईश्वराशी माझा विशेष संबंध असून त्यामुळेच प्रतिदिन मला मंदिरात जाण्याची प्रेरणा मिळते’, असे विधान एस्. सोमनाथ यांनी केले. त्यांनी मंदिरातील ‘विद्यारंभम्’ या विशेष कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात लहान मुलांना अक्षरांचे ज्ञान देऊन त्यांचे शिक्षण चालू केले जाते. सोमनाथ पुढे म्हणाले की, ‘गगनयान’ मोहिमेसाठी अंतराळविरांची निवड करण्यात आली असून त्यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या मोहिमेसाठी मानवांना पाठवण्यापूर्वी मानवासारखे दिसणार्या ‘रोबोट’ना, म्हणजेच ‘ह्युमनॉइड्स’ना पाठवले जाणार आहे.
सौजन्य : ANI News
संपादकीय भूमिका
|