मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याविषयी लहान मुलांवर संस्कार करणे हे आपले कर्तव्य !

आज आम्ही मुलांना राष्ट्रप्रेम शिकवत नाही; म्हणून आम्ही मुलांना राष्ट्रप्रेम शिकवण्यास प्राधान्य द्यायला पाहिजे. मुलांना तिसर्‍या वर्षापासूनच राष्ट्रप्रेम शिकवणे आवश्यक आहे आणि हे माता-पित्यांचे कर्तव्य आहे. त्यात आम्ही बरेच उणे पडलो. आज आम्ही मुलांना काय शिकवतो ? शिका; पण आपल्या देशासाठी, देशबांधवांच्या उत्कर्षासाठी नाही, तर ‘ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळेल; अमेरिका, ऑस्ट्रेलिया असे विदेशात जाऊन अजून अधिक पैसा मिळेल, मग तुम्ही वैभवात लोळाल, त्यासाठी शिका, तरच तुमचे जीवन यशस्वी झाले’, असे म्हणता येईल. ही आजची स्थिती अपेक्षित नाही. उलट ‘आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करा, त्यागातच खरे सुख आहे’, असे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. लहानपणापासूनच हा संस्कार करायला पाहिजे. हेच आमचे कर्तव्य आहे.

– श्रीमती प्रेमा कृष्णमूर्ती, हिंदुत्वनिष्ठ