हमासच्या कमांडरांचा आतंकवाद्यांना आदेश !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायली सैन्याने कह्यात घेतलेल्या हमासच्या एका आतंकवाद्याकडे हमाच्या कमांडरांनी दिलेल्या एका आदेशाची प्रत सापडली आहे. इस्रायली सैन्याने अरबी भाषेतील या प्रतीचे छायाचित्र ‘एक्स’वरून प्रसारित केले आहे. त्यात लिहिण्यात आले आहे की, तुमचा हा शत्रू (इस्रायली) रोग असून त्यावर ‘त्यांचा शिरच्छेद करणे, तसेच त्यांचे हृदय आणि यकृत बाहेर काढणे’, याखेरीज दुसरे कोणतेच औषध नाही !