तांदुळवाडी (जिल्हा सातारा) येथे मंदिरामध्ये पत्ते खेळण्यासह मद्यपींचे मद्यपान !

भाविकांकडून सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे तक्रार !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २० ऑक्टोबर (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावातील भैरवनाथ मंदिरात मद्यपी पत्ते खेळण्यासह मद्य पीत असल्याची घटना उघड झाली आहे. (अन्य पंथीय त्यांच्या श्रद्धास्थानी असे अपप्रकार कधी खपवून घेतील का ? – संपादक) या घटनेचा तांदुळवाडी ग्रामस्थ आणि भाविक यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. काही भाविकांनी गावचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे याविषयी तक्रार केली आहे. नवरात्रोत्सवामुळे अनेक भाविक मंदिरांमध्ये येतात. दर्शनाला येणार्‍या भाविकांना ही गोष्ट निदर्शनास आल्यावर त्यांनी विरोध करून त्याचे ध्वनीचित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले.

अपप्रकार करणार्‍यांना कडक शब्दांत समज दिली आहे ! – राजू मतकर, सरपंच, तांदुळवाडी

गावच्या भैरवनाथ मंदिरामध्ये पत्त्याचा डाव मांडून मद्य पिणार्‍यांना आम्ही कडक शब्दांत समज दिली आहे. घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेतही ‘सार्वजनिक ठिकाणी पत्ते खेळू नका, मद्यपान करू नका’, असे आवाहन करण्यात आले होते. आम्ही गावच्या वतीने अशा चुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लवकरच योग्य ती उपाययोजना करू.

संपादकीय भूमिका :

काँग्रेसने ६ दशके देशाला धर्मशिक्षण न दिल्याचे हे परिणाम आहेत ! ज्यांना मंदिराचे पावित्र्य राखता येत नाही, त्यांना हिंदु तरी कसे म्हणावे ?