मुंबई – येथे हवेचा दर्जा घसरला आहे. मुंबईची हवा नवी देहलीपेक्षा बिघडली आहे. ठाणे, नवी मुंबई येथील हवाही खराब झाली आहे. हवेत साचलेले धूलीकण आणि धुके यांमुळे मुंबईत हवा बिघडत आहे. अनेक भागांत सकाळी आणि सायंकाळी हवेतील धुळीमुळे दृष्यमानताही अल्प झाली आहे.
बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी विकासकांना दक्षतेच्या नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. मुंबईत विविध ठिकाणी पाण्याचा मारा करणारी ३० ‘स्मॉग गन फॉगिंग’ यंत्रे विकत घेण्यात येणार आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारता येतो. त्यामुळे धुळीचे कण भूमीवर बसतात.