कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने किशोरवयीन मुला-मुलींना सल्ला देतांना म्हटले आहे की, त्यांनी लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. २ मिनिटांच्या शारीरिक सुखापासून स्वतःला रोखले पाहिजे.
१. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने एका तरुणाला निर्दोष ठरवले. त्या वेळी न्यायालयाने वरील सल्ला दिला. या वेळी न्यायालयाने किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देण्याचेही मत मांडले. न्यायालयाने म्हटले की, पालकांनीच शिक्षक झाले पाहिजे आणि मुलांना वाईट स्पर्श, अश्लील हातवारे आदींविषयी सांगितले पाहिजे. अल्प वयात शारीरिक संबंध ठेवल्याने आरोग्य आणि पुढे मुले जन्माला घालण्यावरील क्षमतेवर होणार्या दुष्परिणामांविषयी सांगितले पाहिजे.
२. या वेळी न्यायालयाने १६ वर्षांवरील किशोरवयीनांमधील एकमेकांच्या सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना गुन्हा ठरवण्याचा कायदा पालटला पाहिजे, असाही सल्ला दिला. न्यायालयाने म्हटले की, आपल्याला कधी असा विचार करायला नको की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलगीच बळी पडते; कारण मुलेही अशा घटनांत बळी पडतात.
संपादकीय भूमिकाहे न्यायालयाला का सांगावे लागते ? साधना आणि धर्माचरण न शिकवल्यानेच ही परिस्थिती हिंदु समाजावर ओढावली आहे, हे लक्षात घ्या ! |