वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या एका भागात हवामान प्रचंड थंड झाले आहे, तर दुसर्या भागात विक्रमी उष्णता जाणवत आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा पुष्कळ अल्प तापमान आहे, तर पश्चिम भागात सरासरी तापमानापेक्षा १० ते २० अंश सेल्सियस अधिक तापमान असून ‘अशी परिस्थिती राहिल्यास १९९० च्या दशकाचे विक्रम मोडले जाऊ शकतात’, असे म्हटले जात आहे.
अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा परिणाम ‘जेट स्ट्रीम’मुळे होत आहे. ‘जेट स्ट्रीम’ म्हणजे पृथ्वीला चहू बाजूंनी घेरणारी एक गतीमान; परंतु संकीर्ण हवा ! हवामान विशेषज्ञ स्टीव बेंडर यांनी सांगितले की, टेक्सासच्या विक्टोरिया आणि बेमॉन्ट येथील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे, तर ओहायो खोरे आणि फ्लॉरिडा द्वीपकल्पातील तापमान १०-२० अंश सेल्सियस एवढे थंड झाले आहे.