इस्लामाबाद (पाकिस्तान) – भूकेकंगाल झालेल्या पाकिस्तानच्या आता हवाई वाहतुकीवरही गंभीर परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. तेथे सध्या प्रचंड इंधन टंचाई जाणवत असून देशाचे ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’ हे राष्ट्रीय विमानवाहक आस्थापन अडचणीत सापडले आहे. इंधनाच्या अनुपलब्धतेमुळे देशांतर्गत (डोमेस्टिक) आणि आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल) अशा दोन्ही मार्गांवरील (ये-जा) तब्बल ४८ उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. यात १३ देशांतर्गत, तर ११ आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणांचा समावेश आहे. इतर १२ उड्डाणे उशिराने झाली.
सरकारी मालकीच्या ‘पाकिस्तान स्टेट ऑइल’ने थकबाकी न भरल्याने पुरवठा थांबवल्यामुळे विमान आस्थापनासाठी इंधनाची न्यूनता निर्माण झाली आहे.
संपादकीय भूमिकाद्वेषाच्या पायावरच उभारलेल्या देशाचे याहून वेगळे काय होणार ? |