‘मृत्यूहून भयानक यातना भोगण्यापेक्षा मरण बरे’, अशी पित्याची हृदयद्रावक भूमिका !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलींच्या विरोधात हमासच्या आतंकवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली असून त्याविषयीची माहिती सामाजिक माध्यमांतून सर्व जगासमोर येत आहे. हमासने अनेक लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. अशातच हमासकडून ठार करण्यात आलेल्या एका ८ वर्षीय मुलीच्या हतबल पित्याने समाधान व्यक्त केले. थॉमस हँड असे त्यांचे नाव असून ते मूळचे आयर्लंड येथील आहेत. ‘मुलीची हत्या होणे, ही तिच्यावर झालेली कृपाच होती’, असे त्यांना वाटले. एमिली असे त्यांच्या मुलीचे नाव होते.
सौजन्य हेलअवेटसफोरनिकेटर
थॉमस हँड म्हणाले की,
१. हमासच्या आतंकवाद्यांनी एमिलीला गोळ्या घालून ठार मारले. यातना भोगण्यापेक्षा मुलीचा मृत्यू झाला, हे चांगले झाले.
२. हमासच्या आक्रमणात एमिलीचा मृत्यू झाला, अशी बातमी जेव्हा मला मिळाली, तेव्हा मी हे सत्य हसतहसत स्वीकारले. याचे कारण असे की, ज्या शक्यतांचा मी विचार केला होता, त्यापेक्षा चांगले घडले होते.
३. तिचा मृत्यू झाला नसता, तर आज ती गाझामध्ये असती. ‘गाझामध्ये तिच्यासमवेत काय झाले असते ?’, याची तुम्हालाही कल्पना आहे. मृत्यूपेक्षाही भयानक यातना तिला मिळाल्या असत्या. त्यांच्याकडे अन्न नाही, पाणी नाही. तिथे ती एखाद्या काळकोठडीत राहिली असती. प्रत्येक मिनिटाला आणि घंट्याला ती भीतीने गर्भगळीत झाली असती. त्यामुळे तिचा मृत्यू हा आशीर्वादच आहे.
संपादकीय भूमिकायावरून हमासच्या आतंकवाद्यांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते. अशा क्रूर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्या भारतासह जगभरातील धर्मांध मुसलमानांचा धिक्कारच केला पाहिजे ! |