मुंबई – महागड्या चारचाकी फोडून त्यात ठेवलेल्या वस्तू चोरी करणार्या अभिमन्यू अर्जुन गुप्ता उपाख्य रिंकू (वय ३१ वर्षे) याला अटक झाली आहे. तो मुंबईसह नवी मुंबई, पनवेल परिसरातही चोर्या करत होता. त्याने ‘बी.एम्.डब्ल्यू.’ गाडी फोडून त्यातून जवळपास २४ लाख ८ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरली होती. हा प्रकार वांद्रे पोलिसांच्या हद्दीत असणार्या लीलावती रुग्णालयासमोर ७ ऑक्टोबरला घडला होता. या प्रकरणी गाडीचे चालक प्रतीक माहेश्वरी (वय ३७ वर्षे) यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाअशा चोरट्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |