अकोला येथे पत्रकार परिषद
अकोला – सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी द्वेषपूर्ण भाषण करणार्यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सनातन धर्मियांत जागृती करणारी व्याख्याने बैठका घेणे, तसेच ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणे, अशा प्रकारच्या कृती केल्या जाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अकोला येथील हॉटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. या अभियानाच्या अंतर्गत सनातन धर्माचे महत्त्व सांगणारी व्याख्याने घेतली जाणार आहेत, असेही श्री. चेतन राजहंस यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला शिवसेना महानगरप्रमुख, श्री. योगेश अग्रवाल, ‘राष्ट्र जागृती मंच’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय ठाकूर, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे अकोला जिल्हा समन्वयक श्री. अमोल वानखडे आणि इतर हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.