राज्यशासनाचा निर्णय !
मुंबई – मराठवाडा विद्यापिठाच्या नावातील ‘औरंगाबाद’ हा उल्लेख वगळून त्याऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर राज्यशासनाने केले आहे. त्यामुळे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ याऐवजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या नामांतराला मान्यता देण्यात आली. यापुढे विद्यापिठाचा उल्लेख सुधारित नामांतरानुसार करण्याची सूचना शासनाने दिली आहे.
संपादकीय भूमिकाएकेक विद्यापिठाचे नामांतर करण्यापेक्षा केंद्र सरकारने देशभरातील आक्रमकांची नावे पालटण्याचा कायदा करावा ! |