परभणी येथे चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप !

प्रतीकात्मक छायाचित्र

परभणी – येथील जिल्हा सामान्य अस्थिव्यंग रुग्णालयात भारत मोरे (वय ४० वर्षे) रुग्णाचा ६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. आधुनिक वैद्यांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला. चौकशी समितीद्वारे उपचाराची सर्व माहिती पडताळून अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे.

नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार भारत मोरे हे त्यांच्या डाव्या पायाच्या करंगळीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ३ ऑक्टोबर या दिवशी रुग्णालयात भरती झाले होते. आधुनिक वैद्यांनी त्यांच्यावर उपचार करत असतांना त्यांना ‘मोनोसेफ’चे (एक प्रकारचे प्रतिजैविकचे) इंजेक्शन दिले. पहिल्या दिवशी त्यांना या इंजेक्शनचा कोणताही त्रास झाला नाही; परंतु दुसर्‍या दिवसी मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काढलेल्या ‘ईसीजी’मध्ये पालट दिसल्याने त्यांची ‘टू डी इको टेस्ट’ (हृदयाची स्थिती पहाण्यासाठी करावयाची चाचणी) करण्याची आवश्यकता होती;