महागाव (यवतमाळ), ७ ऑक्टोबर (वार्ता.) – तालुक्यातील घोणसरा आणि बरगेवाडी येथील २५ एकरातील गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धाड टाकून गांजा जप्त केला. डोंगराळ भागाचा अपलाभ घेऊन शेतकरी गांजाची शेती करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या प्रकरणी ४ शेतकर्यांना कह्यात घेतले, तर १५ क्विंटलपेक्षा अधिक गांजा जप्त केला. (अल्प वेळेत अधिक पैसा मिळवण्याची लागलेली ओढ आणि गुन्हेगारी वृत्ती, तसेच कायद्याचा धाक नसलेली प्रशासन व्यवस्था याचे हे फलित ! – संपादक) धाडीत एक आरोपी पसार झाला. पोलिसांनी दुसर्या दिवशीही ट्रॅक्टरभरून गांजा जप्त केला.