शासकीय अधिकार्‍यांची खोटी ‘फेसबुक’ खाती सिद्ध करून फसवणूक करणार्‍या शाहरूख खानला अटक !

  • पुणे सायबर पोलिसांची कारवाई ! 
  • गुन्हेगारीत आघाडीवर असणारे धर्मांध !
शाहरूख खानला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

पुणे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकार्‍यांच्या नावाने खोटे ‘फेसबुक’ खाते सिद्ध करून आर्थिक फसवणूक करणार्‍या शाहरूख खानला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. त्याने ‘डॉ. राजेश देशमुख यांच्या ‘फेसबुक’ खात्यावरून बोलत आहे’, असे भासवून ‘मित्राचे जुने फर्निचर (लाकडी साहित्य) विकणे आहे’, असे सांगून ७० सहस्र रुपये घेतले; परंतु फर्निचर न आल्याने तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. शाहरूखने देशातील अनेक आय.पी.एस्. (भारतीय पोलीस सेवा) आणि आय.ए.एस्. (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकार्‍यांची खोटी ‘फेसबुक’ खाती सिद्ध करून त्यातून लाखो रुपये लुटले आहेत.