मंगळयानानंतर पहिल्यांदाच भारतीय यानाने पृथ्वीचे प्रभावक्षेत्र ओलांडले !

बेंगळुरू (कर्नाटक) – सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’च्या ‘आदित्य एल्-१’ यानाने पृथ्वीचे प्रभावक्षेत्र ओलांडून सूर्याच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. २ सप्टेंबर या दिवशी ‘आदित्य एल्-१’चे पृथ्वीवरून प्रक्षेपण केल्यानंतर अवकाशयानाने त्याच्या प्रवासातील दुसरा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार केल्याची माहिती ‘इस्रो’ने त्याच्या ‘एक्स’वरील खात्याद्वारे दिली आहे.
Aditya-L1 Mission:
🔸The spacecraft has travelled beyond a distance of 9.2 lakh kilometres from Earth, successfully escaping the sphere of Earth’s influence. It is now navigating its path towards the Sun-Earth Lagrange Point 1 (L1).
🔸This is the second time in succession that…
— ISRO (@isro) September 30, 2023
‘आदित्य एल्-१’ने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर अंतर पार केले आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकणारे भारताचे हे दुसरेच अवकाशयान आहे. याआधी केवळ ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ म्हणजेच मंगळयान यशस्वीपणे पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेले होते. ‘पी.एस्.एल.व्ही.’च्या साहाय्याने उड्डाण केल्यानंतर आरंभीचे १६ दिवस ‘आदित्य एल्-१’ पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत होते. १९ सप्टेंबर या दिवशी त्याने चौथ्यांदा पृथ्वीची कक्षा पालटली. सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास चालू आहे.
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप
Love Jihad Planned Conspiracy : ५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !