नवी मुंबई, २४ सप्टेंबर (वार्ता.) – खालापूर येथील मोरबे धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२४ पर्यंत नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. यापूर्वी २०२० या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्या पार्श्वभूमीवर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या गावांतील रहिवाशांना सतर्क रहाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोरबे धरणातील पाण्याचा साठा अल्प होऊ लागल्याने २८ एप्रिलपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली होती.