‘चंद्रयान’ चंद्रावर उतरवणे, म्‍हणजे भारतियांनी वर्णविषयक न्‍यूनगंड आणि गुलामगिरी झुगारून दिल्‍याचा ऐतिहासिक क्षण !

उत्तर युरोपमध्‍ये रहाणारा माझा एक मानसशास्‍त्रज्ञ (गोर्‍या वर्णाचा) मित्र आणि मी भारताचे ‘चंद्रयान ३’ चंद्रावर उतरल्‍यासंबंधीची बातमी आम्‍ही एका उपाहारगृहात पहात होतो. त्‍या वेळी शेजारच्‍या पटलावर (टेबलवर) बसलेल्‍या काही गोर्‍या व्‍यक्‍ती ‘चंद्रयाना’संबंधीची बातमी पाहून ‘इस्रो’च्‍या शास्‍त्रज्ञांकडे पाहून ‘अरे, यांच्‍यामधील सर्व लोक काळे आहेत आणि एकही व्‍यक्‍ती गोरी नाही’, असे बोलत असलेले त्‍याने ऐकले. जणूकाही शास्‍त्रज्ञांमध्‍ये गोरी व्‍यक्‍ती असल्‍यानंतर ती बातमी त्‍यांच्‍या दृष्‍टीने योग्‍य आणि सहन करण्‍यायोग्‍य ठरली असती. बोलत असलेल्‍या व्‍यक्‍ती पत्रकार होत्‍या आणि त्‍यांच्‍या बोलण्‍याचा रोख टाळ्‍या वाजवणार्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या दिशेने होता. वर्णभेद मानत नसलेल्‍या माझ्‍या मित्राला हे ऐकून धक्‍काच बसल्‍याचे त्‍याने मला सांगितले. त्‍या व्‍यक्‍तींच्‍या बोलण्‍याचा रोख चंद्रयानाच्‍या नियंत्रणासाठी कक्षात बसलेल्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या वर्णाविषयी होता, हे त्‍याच्‍या लक्षात आले. ‘चंद्रयान’ चंद्रावर उतरल्‍यासंबंधीच्‍या विषयावर त्‍यांचे बोलणे नव्‍हते. काळ्‍या वर्णाच्‍या लोकांनी ‘चंद्रयान’ मोहीम यशस्‍वी केली, हे त्‍या गोर्‍या लोकांसाठी निराशाजनक वृत्त होते. तसेच यामुळे वर्णभेदाविषयीचा बुरूज आज ढासळला आहे, हे लक्षात आले.

१. गोर्‍या म्‍हणजेच पाश्‍चिमात्‍य लोकांची वर्णद्वेषी मानसिकता !

गोर्‍या लोकांच्‍या दृष्‍टीने यश हे अजूनही वर्णाशी जोडले जात आहे. सर्वसाधारणपणे पाश्‍चिमात्‍य लोकांच्‍या दृष्‍टीने जो गोरा, देखणा आहे आणि ज्‍याचे डोळे निळे आहेत, तो नायक असतो. मग ते यश कोणत्‍या क्षेत्रात आहे, याचा काही संबंध नसतो. त्‍यामुळे रॉकेटचे शास्‍त्र किंवा अवकाशामधील संशोधन हे सर्व शास्‍त्रांमधील गुंतागुंतीचे शास्‍त्र वर्णविषयी तत्त्वज्ञान स्‍वीकारत नसल्‍याने त्‍यांच्‍या मनातील अजून एक बुरूज ढासळला. आमच्‍या नायकांची वर्णाविषयीची व्‍याख्‍या ही सविस्‍तर असून त्‍यांना वर्णाविषयी पूर्ण कल्‍पना आहे. चंद्रावर यान उतरवण्‍यासंबंधी गोर्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांनी थट्टा आणि उपहास करणे, हे ‘भारतियांकडे मोठे आणि काही अर्थपूर्ण करण्‍याची क्षमता नाही अन् म्‍हणून त्‍यांच्‍यावर राज्‍य करावे, वसाहत निर्माण करावी’, ही त्‍यांची मानसिकता दर्शवते.

डॉ. रजत मित्रा

२. ‘भारतीय हे काळ्‍या वर्णाचे आणि गोर्‍या लोकांचे गुलाम’, ही गोर्‍या लोकांची मानसिकता

या घटनेवरून लक्षात येते की, आम्‍हाला अजून असे काही निकाल साधून सर्व जगाला विशेषतः गोर्‍या वर्णाच्‍या काही लोकांना त्‍यांची संकल्‍पना चुकीची आहे, तसेच त्‍याच्‍या मूळाशी पूर्वग्रहदूषित मानसिकता आहे आणि अजूनही ती तशीच आहे, हे दाखवून दिले पाहिजे. पाश्‍चिमात्‍य प्रसिद्धीमाध्‍यमे भारताविषयी सांगतांना समाजातील वाईट गोष्‍टी आणि गरिबी हटवणे, अशी व्‍याख्‍या सांगत असतात आणि तसे आपल्‍याला ओळखतात; परंतु चंद्रयानसारखे यश आपल्‍याला आपल्‍या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर काढेल; कारण भारत हे चंद्रावर यान उतरवणारे चौथे आणि काळ्‍या वर्णाच्‍या लोकांचे एकमेव राष्‍ट्र ठरले आहे. अमेरिका आणि रशिया ही गोर्‍या वर्णाच्‍या लोकांची राष्‍ट्रे आहेत. चीन हे तिसरे राष्‍ट्र आहे ज्‍यांना काळ्‍या वर्णाचे म्‍हणता येईल; परंतु ते स्‍वतःला गोरे समजतात, तसेच गोरे लोकही त्‍यांना काळ्‍या वर्णाच्‍या भारतियांपेक्षा वेगळे समजतात.

मला नेहमी आश्‍चर्य वाटते की, गोरे लोक चीनपेक्षा ‘भारताची कामगिरी मात्र अल्‍प दर्जाची किंवा नशिबाने झालेली’, असे मानतात. या गोष्‍टीचे मी शोधलेले उत्तर, म्‍हणजे भारतियांचा वर्ण आणि भारताला गुलाम समजण्‍याची त्‍यांची मानसिकता ! ‘भारतातील लोक हे काळ्‍या वर्णाचे आणि गोर्‍या लोकांचे गुलाम’, अशी आतापर्यंत गोर्‍या लोकांची मानसिकता होती; परंतु ‘चंद्रयान सोडणे आणि ते चंद्रावर उतरवणे’, या ऐतिहासिक घटनेने गोर्‍या लोकांच्‍या वर्णभेदाच्‍या कल्‍पनेचा चुरा झाला आहे. खरे तर बुद्धीमत्ता वा क्षमता यांचा कातडीच्‍या रंगाशी काहीही संबंध नाही.

३. भारत आता वैदिक काळातील अवस्‍थेकडे पोचत आहे !

आता भारतियांच्‍या मनाने कल्‍पनेच्‍या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. यामधून ते भारतावर आक्रमण होण्‍यापूर्वीच्‍या वैदिक काळातील भारताच्‍या अवस्‍थेकडे पोचले आहेत. आतापर्यंत आपली बुद्धी आपला जीव वाचवण्‍यामध्‍ये अडकलेली होती, तसेच आपल्‍या समाजात अपराधीपणाची भावना होती. ‘मालक जे करू शकतात, ते भिकारी कसे करू शकतील ?’, ही सर्व बंधने तोडून आता अज्ञाताकडे झेप घेण्‍याची वेळ आली आहे, ज्‍या ठिकाणी कल्‍पना करणे, हा शब्‍द वाईट समजला जाणार नाही. ‘येणार्‍या काळात चंद्रावर चंद्रयान उतरवणे, म्‍हणजे भारतियांनी वर्णविषयक न्‍यूनगंड आणि गुलामगिरी झुगारून दिल्‍याचा क्षण होता’, अशी त्‍याची व्‍याख्‍या केली जाईल.

लेखक : डॉ. रजत मित्रा, मानसशास्‍त्रज्ञ आणि ‘द इनफिडेल नेक्‍स्‍ट डोअर’ पुस्‍तकाचे लेखक

(साभार : https://rajatmitra.co.in या संकेतस्‍थळावरून)