
वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदूबहुल देशातील हिंदूंची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांच्या अनेक समस्या असून त्यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा एकच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी केले. चांदपूरगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी केलेले मार्गदर्शन ऐकून गावातील माजी प्रमुख आणि अन्य ग्रामस्थ यांनी ‘हा विषय इतर गावातही सांगूया’, अशी इच्छा व्यक्त केली.
श्री. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले, ‘‘आज हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्या समस्या पुष्कळ वाढल्या आहेत. एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु भगिनींना फसवले जात आहे, तर दुसरीकडे ‘हलाल सर्टिफिकेट’च्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करून भारताची अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचे काम सातत्याने चालू आहे. त्यामुळे आज संपूर्ण हिंदु समाजाने जागे होण्याची आवश्यकता आहे.’’
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !