जालना येथे अवैध बायोडिझेल पंपावरील धाडीत पोलिसांकडून लाखो रुपयांचे साहित्‍य जप्‍त !

प्रतिकात्मक चित्र

जालना – छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्‍या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्‍या पथकाने शहरातील औद्योगिक, भीम आणि निधोना रस्‍त्‍यावरील २ ठिकाणी २६ ऑगस्‍टच्‍या रात्री धाड घातली. या धाडीत ४ सहस्र लिटर बायोडिझल आणि गोडाऊनमधील टाक्‍या, इन्‍व्‍हर्टर यंत्रे आणि इतर साहित्‍य मिळून लाखो रुपयांचा माल पोलिसांनी जप्‍त केला आहे. या वेळी गोडाऊनमध्‍ये छोटासा डिझेल पंप सिद्ध करून त्‍यामध्‍ये बायोडिझेल मोजमाप करण्‍यासाठी यंत्र लावण्‍यात आले होते. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

अवैध बायोडिझेलचा साठा होण्‍यापूर्वीच पोलिसांना संबंधित गुन्‍हेगारांची माहिती कशी मिळत नाही ? असे निद्रिस्‍त पोलीस काय कामाचे ?