उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. राधा राहुल शिंदे ही या पिढीतील एक आहे !
‘श्रावण शुक्ल द्वादशी (२८.८.२०२३) या दिवशी चि. राधा राहुल शिंदे हिचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिच्याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
चि. राधा राहुल शिंदे हिला तृतीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणात झालेले साधनेचे प्रयत्न
‘या काळात मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे आणि सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, अशा सेवा करत असे. त्या वेळी मी आधुनिक वैद्यांकडून औषधे आणि ‘इंजेक्शन्स’ घेतांना ‘प.पू. डॉक्टरच मला औषध अन् ‘इंजेक्शन’ देत आहेत आणि श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र माझ्याभोवती फिरत आहे’, असा भाव ठेवत असेे. त्यामुळे माझ्या मनावर कोणताच ताण अथवा भीती नव्हती. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने या काळात मला कोणताच त्रास झाला नाही.
२. वय ९ मास ते १ वर्ष
अ. राधा ९ मासांची असल्यापासून मला ‘कापूर आणि अत्तर यांचे उपाय कसे करायचे ?’, ते दाखवते. मला उपाय करण्याचे विस्मरण झाले की, ती मला त्याची आठवण करून देते.
आ. तिला कुंकू लावायला पुष्कळ आवडते.
३. वय १ ते २ वर्षे
अ. राधा १ वर्षाची होईपर्यंत मी व्यष्टी साधनेसह सामाजिक प्रसारमाध्यमांची (सोशल मिडियाची) सेवा केली. तेव्हा तिने मला सेवा करतांना कधीच त्रास दिला नाही.
आ. ती प्रत्येक गुरुवारी असलेल्या भक्तीसत्संगात माझ्यासह प्रार्थना आणि सद़्गुरूंंचा श्लोक म्हणते.
इ. ती माझ्यासह आरती म्हणण्याचा प्रयत्न करते अन् जयघोषही करते.
ई. ती झोपून उठल्यावर कधीच रडत नाही. ती नेहमी हसतमुख असते.
उ. ती वडीलधार्या व्यक्तींना नमस्कार करते.
३. स्वभावदोष
हट्टीपणा आणि राग येणे
४. कृतज्ञता
श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर मला राधासारखी गोड मुलगी दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. शीतल राहुल शिंदे (कु. राधाची आई), भोसरी, पुणे. (३१.१.२०२३)