‘सर्व्हर डाऊन’ झाल्यामुळे राज्यात तलाठी भरती परीक्षेत गोंधळ !

(‘सर्व्हर डाऊन’म्हणजे संगणकातील तांत्रिक बिघाड)

मुंबई – तलाठी भरतीसाठी राज्यात २१ ऑगस्ट या दिवशी संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांत परीक्षेच्या वेळी ‘सर्व्हर डाऊन’ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला.

सौजन्य झी २४ तास 

अकोला जिल्ह्यातील बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर सहस्रावधी विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते; मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. याचा परिणाम परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करता आला नाही. नागपूर येथील ‘बी.एम्.व्ही.’ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात वेळेत प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार केली. महसूल विभागाकडून ४ सहस्र ६४४ तलाठी पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी १० लाख ४१ सहस्र जणांनी अर्ज केले आहेत.