परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिलेली उत्तरे

अ. साधक : कितीही स्‍वयंसूचना दिल्‍या, तरी कुटुंबातील सदस्‍यांविषयी वाईट गोष्‍टीच आठवतात.

परात्‍पर गुरु डॉक्‍टर : आता शिक्षापद्धतीचा वापर करा !

आ. साधिका : आश्रमात येण्‍यापूर्वी असुरक्षित वाटायचे. आता आश्रमात आल्‍यावर तसे वाटत नाही.

परात्‍पर गुरु डॉक्‍टर : आश्रमात आपण देवाच्‍या समवेत असतो; म्‍हणून सुरक्षित असतो.

इ. साधिका : मी सूक्ष्मचित्रे काढते; परंतु मी काढलेले सूक्ष्मचित्र कलेची सेवा करणार्‍यांना अपेक्षित असे नसते; म्‍हणून मला वाईट वाटते.

प.पू. डॉक्‍टर : देव साधकाला काळानुसार आवश्‍यक तेवढेच सूक्ष्मज्ञान देतो. त्‍या वेळी तुम्‍हाला जे आवश्‍यक होते, तेच ज्ञान तुम्‍हाला मिळाले.

ई. साधिका : मी आध्‍यात्मिक प्रगतीसाठी मनाचा अभ्‍यास करायचा प्रयत्न करते.

प.प. डॉक्‍टर : देव शब्‍दांच्‍या पलीकडे आहे; म्‍हणून प्रत्‍येक विचार लिहून काढायला पाहिजे. बुद्धीने मनाचा अभ्‍यास करू नये.

आधुनिक वैद्या रूपाली भाटकार

२. कु. प्रार्थना महेश पाठक

(वय १२ वर्षे आणि आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) हिने सत्‍संगात सांगितलेली सूत्रे

अ. ‘फलक (ब्‍लॅक बोर्ड) हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा सेवक आहे. तो सर्व साधकांच्‍या चुका पोटात घेतो. ती चूक फलकाच्‍या माध्‍यमातून प.पू. डॉक्‍टरांपर्यंत पोचते. (आश्रमात साधक स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी स्‍वत:च्‍या चुका फलकावर लिहितात.)

आ. सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेले ग्रंथ किती अमूल्‍य आहेत ! हातात घेतल्‍यावर ‘ते बाजूला ठेवावे’, असे वाटतच नाही, तसेच ते हातात धरले की, हलके वाटते.

३. अनुभूती

अ. पूर्ण सत्‍संगात माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू होता. माझे मन स्‍थिर होते आणि मला शांतीची स्‍थिती अनुभवता आली.

आ. काही साधकांनी सांगितले, ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, आपण पूर्वी आमच्‍यासाठी नामजपादी उपाय करत होतात. ते आठवले, तरी आम्‍हाला आध्‍यात्मिक लाभ होऊन त्रासाचे निवारण होते.’’

इ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे कुठलेही रूप डोळ्‍यांसमोर आणले, तरीही आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होतो.’

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.