‘हे बंधू ! लोखंडाला लागलेल्या गंजासमान पापी जीव सोन्यासमान शुद्ध झाले आहेत; कारण भगवंताने त्यांना सद़्गुरुरूपी परिसाचा स्पर्श करवून दिला आहे (सद़्गुरूंची भेट घालून दिली आहे). हे बंधू ! त्यांनी आपलेपणाचा भाव, अर्थात् अहंकार सोडून दिला आहे आणि भगवन्नामाने त्यांच्या मनात घर केले आहे. ज्योतिस्वरूप परमात्म्याने त्यांना आपल्या ज्योतीत विलीन केले आहे.
– गुरु अमरदासजी (संदर्भ : ऋषी प्रसाद, जुलै २०२०)