लवकर या साईनाथा ।

गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) दर्शनाची ओढ मनाला लागल्‍यावर मन भावविभोर होऊन गुरुदेवांचा धावा करू लागते.

सौ. स्‍वाती शिंदे

चरणी घेई बा गुरुदेवा ।
वाट किती मी पाहू देवा ।
लवकर या साईनाथा ।
चरणी ठेवते मी माथा ॥ १ ॥

तारली तुम्‍ही तुकोबांची गाथा ।
तुम्‍हीच देवा, अनाथांच्‍या नाथा ।
ऐसे कृपाळू तुम्‍हीच देवा ।
वेड लावता आम्‍हा जिवा ॥ २ ॥

काहो देवा, अंत पहाता ।
उशीर का हो असा लावता ।
शीण हा जाई तुम्‍हा पहाता ।
अंतरास माझ्‍या तुम्‍ही भावता ॥ ३ ॥

वेगे येई बा, नारायणा ।
अश्रू अनावर बघ रे नयना ।
विरह तुझा रे आता साहिना ।
दे दर्शन रे मनमोहना ॥ ४ ॥

पहाता सुहास्‍य वदन तुमची मूर्ती ।
जन्‍मोजन्‍मी मनास देई स्‍फूर्ती ।
मग हर क्षण होई बघ भावकृती ।
माझिया मनाची ऐसी करावी स्‍थिती ॥ ५ ॥

तुझ्‍याशीच जोडतात सारी नाती ।
मग येई एकरूपतेची अनुभूती ।
हेच मागणे बा गुरुदेवा ।
अंती चरणी घेई बा आता ॥ ६ ॥

टीप : गुरुदेवा, देवा, साईनाथा, नारायणा, मनमोहना हे सर्व शब्‍द सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उद्देशून लिहिले आहेत.

कवितेच्‍या या ओळी मी यजमान श्री. संदीप यांना पाठवल्‍यावर त्‍यांनी मला पुढील ओळी पाठवल्‍या.

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२२)

सामोरे उभे गुरु क्षणाक्षणाला ।

श्री. संदीप शिंदे

जे जे तू मागितले ।
ते ते तुजला दिधले ।
शांती देणार नाही का ।
तुझिया मनाला ॥ १ ॥

ओढ रहावी दर्शनाची ।
हीच आस राहो मनी ।
अंतःचक्षू उघडूनी पहा ।
सामोरे उभे गुरु क्षणाक्षणाला ॥ २ ॥

– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२२)