धर्माभिमानी आणि संतांप्रती भाव असलेली अमरावती येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली कु. राधिका राजेश मावळे (वय १४ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधिका राजेश मावळे ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्‍ये ‘कु. राधिका मावळे महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आली असून तिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये तिची आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के झाली आहे. तिच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्‍यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.६.२०२३)
‘सनातनमध्‍ये आलेल्‍या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्‍यात निर्माण झाला नाही.’
– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. राधिका मावळे

अमरावती येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. राधिका राजेश मावळे हिची तिच्‍या आईच्‍या आणि साधिकेच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. अर्चना मावळे (कु. राधिकाची आई), बडनेरा, अमरावती.

१ अ. धर्माचरण करणे : ‘कु. राधिका सात्त्विक केशभूषा आणि वेशभूषा करते. ती तिच्‍या मैत्रिणींना कुंकू लावण्‍याचे महत्त्व सांगते.

१ आ. धर्माभिमान : तिच्‍या शाळेतील शिक्षक हिंदु धर्माविषयी काही अयोग्‍य बोलल्‍यास ती तिच्‍या मैत्रिणींना त्‍याविषयी अवगत करते. ती शिक्षकांनाही त्‍याची जाणीव करून देते.

सौ. अर्चना मावळे

१ इ. इच्‍छा पूर्ण होणे : तिने व्‍यक्‍त केलेल्‍या लहान-सहान इच्‍छा कुणाच्‍या तरी माध्‍यमातून किंवा कुठल्‍या तरी रूपाने पूर्ण होतात, उदा. एखाद्या वेळी ती शाळेत न जाता घरी राहिली, तर त्‍या दिवशी शाळेत शिक्षक न आल्‍याने वर्ग होत नाही आणि तिच्‍या अभ्‍यासाची होऊ शकणारी हानी टळते.

१ ई. भाव

१ ई १. साधकांप्रती भाव : ती सतत म्‍हणते, ‘‘अनुभूतीमावशी (साधिका सौ. अनुभूती टवलारे) आणि अन्‍य साधक माझ्‍यासाठी किती करतात !’’

१ ई २. दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव : तिला दैनिक ‘सनातन प्रभात’ अयोग्‍य ठिकाणी ठेवलेला दिसला, तर ती तो योग्‍य ठिकाणी ठेवते.

१ ई ३. संतांप्रती भाव : ती नेहमी म्‍हणते, ‘‘मी पू. पात्रीकरकाकांच्‍या (सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांच्‍या) चरणी पुष्‍कळ कृतज्ञ आहे.’’

१ ई ४. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या प्रती भाव : ती झोपतांना ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या कुशीत झोपली आहे’, असा भाव ठेवते.

१ उ. राधिकामधील स्‍वभावदोष : हट्टीपणा, आवडीचे पदार्थ खाणे आणि काही सेवा सांगितली, तर लगेच न करणे अन् काही वेळा विसरणे.’

२. सौ. अनुभूती टवलारे (साधिका), अमरावती

२ अ. सेवाकेंद्रात रहाता येण्‍यासाठी सेवाकेंद्राच्‍या जवळ असलेल्‍या शाळेत प्रवेश घेणे : ‘राधिका एक वर्षापूर्वी प्रत्‍येक शनिवारी आणि रविवारी, तसेच अन्‍य सुटीच्‍या दिवशी अमरावती सेवाकेंद्रात येऊन रहात असे. तेव्‍हापासून तिला सेवाकेंद्रात रहाण्‍याची ओढ लागली. त्‍यामुळे सेवाकेंद्राच्‍या जवळच असलेल्‍या शाळेत तिने प्रवेश घेतला. सेवाकेंद्रात तिचे पालक रहात नसतांनाही ती सेवाकेंद्रात राहू लागली.

२ आ. अनेक अडचणी येऊनही राधिकाच्‍या तळमळीमुळे तिला सेवाकेंद्राच्‍या जवळ असलेल्‍या शाळेत प्रवेश मिळणे : तिला सेवाकेंद्राच्‍या जवळ असलेल्‍या शाळेत प्रवेश मिळण्‍यासाठी बर्‍याच अडचणी आल्‍या. राधिकाला ‘त्‍या शाळेत प्रवेश मिळणार नाही’, असे समजले. तेव्‍हा तिने प्रार्थना केल्‍या. तिची तळमळ पुष्‍कळ वाढली होती. नंतर काही दिवसांनी राधिकाला त्‍या शाळेत प्रवेश मिळाला.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.३.२०२३)