कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !
‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. शिवाजी चिले यांना कोरोना निवारणासाठी सनातन संस्थेने सांगितलेला नामजप (टीप) सांगितला होता. ते वाचक त्याप्रमाणे नामजप करत होते. (टीप : ‘कोरोना महामारीवरील प्रतिबंधक उपाय म्हणून साधक ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री गुरुदेव दत्त । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप प्रतिदिन १०८ वेळा करत होते.’ – संकलक)
मी त्यांच्याकडे गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घ्यायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘एकदा मला स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. ते मला म्हणाले, ‘तुम्ही जो नामजप करत आहात, तो चुकीचा आहे.’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘आधुनिक वैद्य गवळी यांनी सांगितल्यानुसार मी हा नामजप करत आहे.’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘उद्या कागद बघा आणि त्याप्रमाणे करा.’
मी दुसर्या दिवशी पहाटे उठल्यावर तुम्ही लिहून दिलेला कागद पाहिला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी ‘श्री दुर्गादेव्यै नमः।’ या ठिकाणी ‘श्री भवानीदेव्यै नमः।’, असे म्हणत होतो.’’
त्यांचे बोलणे ऐकून ‘गुरुमाऊलींचे सर्वत्र लक्ष असते’, या विचाराने माझे मन भरून आले.’
– होमिओपॅथी वैद्य सहदेव गवळी, रत्नागिरी (६.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |