परमात्‍माप्राप्‍तीसाठी करायच्‍या आवश्‍यक कृती

१. कर्म, बोलणे आणि व्‍यवहार ईश्‍वराशी जोडणे : आपले कर्म, आपले बोलणे आणि आपले व्‍यवहार यांत तुम्‍ही उद्देश आणि आश्रय ईश्‍वराचा ठेवला, तर तुमचे जीवन सत्-चित्-आनंद स्‍वरूप परमात्‍म्‍याशी भेट घालून देणारे होईल.

२. आसक्‍ती सोडावी ! : कुणीही चितेवर रुपये-पैसे, दागदागिने, घर-दुकान इत्‍यादी घेऊन जात नाही. प्रत्‍येकाला सर्व इथेच (पृथ्‍वीवर) सोडूनच जावे लागते.

३. मनुष्‍यजन्‍मात करायची सर्वांत मोठी कामे : आत्‍मज्ञान मिळवून आपल्‍या अंतर्यामी परमात्‍म्‍याकडे येणे, कठीण परिस्‍थितींमध्‍ये खंबीर (दृढ) रहाणे आणि वर्तमानकाळाचा सदुपयोग करून षड्‍विकारांतून मुक्‍त होणे.

४. प्राप्‍त परिस्‍थिती आणि मिळालेल्‍या वस्‍तू यांचा आसक्‍ती अन् द्वेष यांच्‍यारहित होऊन उपयोग केला, तर जीवन्‍मुक्‍तता ही आपल्‍या हातातील गोष्‍ट आहे. आत्‍मसाक्षात्‍कार आपल्‍या मुठीत येईल !’

(संदर्भ : लोक कल्‍याण सेतू, डिसेंबर २०२१)