चित्रपट अभिनेते-अभिनेत्री यांच्यापेक्षा बाळगोपाळांना अधिक महत्त्व द्या !

दहीहंडी पथकांची मागणी

मुंबई – यंदा चित्रपट अभिनेते-अभिनेत्री यांच्यापेक्षा बाळगोपाळांना अधिक महत्त्व द्या, अशी दहीहंडी पथकांनी मागणी केली आहे. ‘दहीहंडीच्या दिवशी होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाययोजना असावी, दहीहंडीची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत करावी आणि अधिकाधिक आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव आयोजित करावा’, अशाही मागण्या पथकांनी केल्या आहेत.

दहीहंडी मंडळावर नोंदवलेले गुन्हे रहित करण्याची मागणी !

‘दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ पर्यंत करण्यात यावी आणि गोपाळकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित करावी, तसेच दहीहंडी मंडळावर नोंदवलेले गुन्हे रहित करावेत’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन याआधी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

दहीहंडी पथकेच अभिनेते-अभिनेत्री यांना उत्सवात आमंत्रित करतात आणि त्यांना मान-सन्मान देतात. त्यामुळे पथकांनी अशी मागणी करण्यापेक्षा अभिनेते-अभिनेत्री यांना निमंत्रित न करता बाळगोपाळांना अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टीने धर्मशास्त्रानुसार दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे, ही अपेक्षा !