‘मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला घरातील लोकांचा पुष्कळ विरोध झाला. मी पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे आणि पू. अशोक पात्रीकर यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला प्रारंभ केला. हळूहळू माझे यजमान आणि घरातील अन्य व्यक्ती यांचे मतपरिवर्तन झाले.
एकदा मला ‘काहीतरी अघटित (लवकरच) घडणार आहे’, असे वाटत होते. त्यानंतर २ दिवसांनी माझ्या यजमानांना त्रास होऊ लागला. मी कसलीही टाळाटाळ न करता त्यांना रुग्णालयात नेले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या यजमानांच्या मेंदूची शीर फाटून रक्त बाहेर पडत आहे.’’ आधुनिक वैद्यांनी यजमानांवर उपचार केले.
गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला घटनेविषयी सूचना आधीच मिळाली होती. त्यामुळे यजमानांवर लवकर उपचार झाले. घरातील व्यक्तींचे साहाय्य न घेता आणि मनाने खचून न जाता सर्व सुलभतेने पार पडले. भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता !’
– सौ. सरिता तरोणे, दुर्ग, छत्तीसगड. (२४.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |