सांगली – ज्या राजांच्या नावे सांगलीतील नावलौकिक असलेले उद्यान आहे, त्या प्रतापसिंह उद्यानातील राजे प्रतापसिंह पटवर्धन यांचा पुतळा सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. ५७ वर्षांपूर्वी स्थापना केलेल्या या पुतळ्याचा रंग उडाला असून चौथरा आणि परिसरातील दगडही निखळलेले आहेत. या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके म्हणाले, ‘‘२२ ऑगस्टला राजेंची पुण्यतिथी असून त्या अगोदर महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची रंगरंगोटी करावी, तसेच बाजूच्या चौथर्याचे काम करावे.’’