मुलांना चुकीच्या सवयी लावल्याने होणारे दुष्परिणाम !

डॉ. दीपक जोशी

निसर्गाेपचार तज्ञ / वैद्य (नॅचरोपॅथी डॉक्टर) म्हणून जेव्हा मुले पालकांसह माझ्याकडे येतात, तेव्हा असे लक्षात आले की, मुलांना अभ्यासाचा जो ताण असतो, तो ५० टक्केही नसतो; पण त्यांच्या खाण्याच्या, झोपण्याच्या सवयी आणि दिवसभर भ्रमणभाष संच अन् टीव्ही बघण्याच्या सवयी या विचित्र असतात. आई-वडील संध्याकाळी कामावरून जेव्हा घरी येतात, तेव्हा मुले काही वेळा अभ्यासाचे नाटक करतात. साधारणतः एक डॉक्टर म्हणून आमचा अभ्यास असा आहे की, ९० टक्के पालक आपल्या मुलांचा स्वतःला त्रास व्हायला नको; म्हणून त्यांच्या हातात भ्रमणभाष संच देणे, प्रतिदिन मॅगी खायला देणे, अशा सवयी लावतात. असेही काही पालक आहेत की, मुलांना १० रुपये देऊन ‘चायनीज भेळ मिळते, ती खा’, असे म्हणून दुर्लक्ष करतात. अशा तर्‍हेने ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांची किडनी निकामी होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे.

– डॉ. दीपक जोशी, पनवेल, रायगड. (१.८.२०२३)