‘समुद्राच्या अपार जलराशीवर एक जहाज जात आहे. जवळपास कित्येक मैलांपर्यंत पाणीच पाणी आहे. भूमीचा कुठेही ठावठिकाणा नाही. या जहाजाच्या शिडावर एक पक्षी बसला आहे. त्याच्यासाठी विश्रांतीचा तोच एकमेव सहारा आहे. तो थोडा वेळ इकडे-तिकडे उडतो; परंतु शेवटी त्याच जहाजावर त्याला परत यावे लागते. ते जहाजच त्या पक्ष्यासाठी विश्रांतीचे अनन्य स्थान आहे. अगदी असेच ईश्वराच्या अनन्य भक्तासाठीही ईश्वरच एकमेव स्थान आहे, जेथे त्याला शुद्ध सुख, विश्रांती मिळते. सांसारिक सुखांच्या मागे भटकण्याची व्यर्थता त्याच्या लक्षात आलेली आहे. जणू आता त्याला गोड पाण्याचा स्रोत मिळाला आहे.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०१९)