सातारा, १९ जून (वार्ता.) – शहरात विविध जाती-धर्माचे लोक शांततेने रहातात. सध्या काही लोक जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यात शांतता नांदावी, यासाठी मुसलमान समाज प्रयत्न करत आहे. इस्लाम धर्म चुकीचे समर्थन करत नाही, असा खुलासा जमिअत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या वतीने नुकताच करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे हा खुलासा करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या जातीय सलोखा बिघडवण्याचे काम चालू आहे. अशी विघ्ने निर्माण करणार्या आणि जातीय तणाव निर्माण करणार्या उपद्रवी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. (जातीय सलोखा बिघडवणारे स्वत:चे धर्मबांधव कोण आहेत, हे जमिअतला माहिती आहे, तर ती गप्प का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे आहे, तर जमिअतने अयोग्य व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणार्या त्यांच्या धर्मबांधवांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत, लव्ह जिहाद्यांना स्वत:हून पोलिसांकडे सोपवले पाहिजे होते. तसे घडतांना दिसत नाही. |