कन्नड साहित्यिक वीरभद्रप्पा यांची वैचारिक दिवाळखोरी !
चामराजनगर (कर्नाटक) – शालेय पाठ्यपुस्तकांतून गोळवलकर, सावरकर इत्यादी बनावट देशभक्तांचे धडे काढून टाकावेत. असे धडे मुलांना शिकवू नयेत. शासनाने याविषयी आदेश लागू करावा, अशी मागणी कन्नड साहित्यिक वीरभद्रप्पा यांनी व्यक्त केला आहे. ‘पूर्वीच्या शासनाने मानवविरोधी, देशविरोधी आणि समाजविरोधी पाठ्यक्रम लागू केला, हे चुकीचे आहे. हा आपल्या राज्यघटनेचा अपमान आहे. नवीन सरकारने हे पालटावे’, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाराष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी सहस्रो पानांचे अजरामर साहित्य लिहिणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असे विधान करणार्या अशा तथाकथित साहित्यिकांचे साहित्य काय असेल, हे यावरून लक्षात येते ! |