‘आपल्या मोठ्या भावाला, म्हणजे बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि धाकट्या भावाला म्हणजे बाळ तथा नारायणाला एका बाँबस्फोट प्रकरणात अटक झाली, हे त्यांना कळले तेव्हा पुढील उद्गार काढणारे सावरकर धन्य होत !
‘अशीच सर्व फुले खुडावी । श्रीरामचरणी अर्पण व्हावी ।
काही सार्थकता घडावी । या नश्वर देहाची ।।’
वडील बंधूंना अटक झाल्यावर त्यांच्या धैर्यशाली आणि वीरपत्नी मातृसमान येसूवहिनीला लिहिलेल्या मृत्यूपत्रातील काही ओळी –
‘अमर होय ती वंशलता ।
निर्वंश जिचा देशाकरिता ।।’
‘हे काय बंधु असतो जरि सात आम्ही ।
त्वत्स्थंडिलीच दिधले असते बळी मी ।।’
दीप्तानलात निजमातृविमोचनार्थ ।
हा स्वार्थ जाळूनि आम्ही ठरलो कृतार्थ ।।’
– वीर सावरकर (माझे मृत्युपत्र)
‘माझे मृत्यूपत्र’ मधील ‘निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश’ या शब्दरचनेतून सावरकरांचे द्रष्टेपण प्रकट होते.