१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी स्वप्न पडणे आणि स्वप्नात गौरी-गणपतीच्या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची पूजा करणे
‘फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्या होत्या. त्या येण्याच्या ५ दिवस आधी मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी भाद्रपद मासातील गौरी-गणपतीच्या कालावधीत आमच्या घरी सुनेच्या समवेत गौरींची स्थापना करण्याची सिद्धता करत होते. मी गौरींच्या चहूबाजूंनी तोरणे लावली, फराळाची ताटे ठेवली, रांगोळ्या काढल्या आणि फळे ठेवून त्यांची आरास केली. सुनेने मला विचारले, ‘आता लक्ष्मी (गौरी) स्थापन करूया का ?’ त्याच वेळी त्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आल्या. मी सुनेला म्हटले, ‘अगं, आपल्याकडे साक्षात् चालत्या-बोलत्या लक्ष्मी आल्या आहेत. आपण त्यांचीच पूजा करूया.’ त्या वेळी मला फार आनंद झाला आणि आम्ही त्यांची पूजा केली.
२. प्रत्यक्षात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद आश्रमात आल्यामुळे स्वप्न साकार झाल्याचे जाणवणे
मला वरील स्वप्न पडल्याचे मी अन्य साधिकांना सांगितले. त्यानंतर ४ दिवसांनी मी देवद आश्रमातील परिसरात उभी होते. त्या वेळी समोरून प्रत्यक्ष श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आल्या आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली. तेव्हा मला फार आनंद झाला. त्या वेळी ‘माझे स्वप्न साकार झाले’, असे मला वाटले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आल्यापासून देवद आश्रमातील संपूर्ण वातावरण आनंदी झाले होते. आश्रमाचा सर्व परिसर चैतन्यमय झाला होता. माझे संपूर्ण शरीर हलके झाले होते.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमातून निघत असतांना आलेल्या अनुभूती
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ देवद आश्रमातून निघत असतांना मला चहूबाजूंनी प्रकाश जाणवत होता.
आ. त्या साधकांना भेटत पुढे पुढे जात असतांना ‘त्यांच्या पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे मला दिसत होते.
इ. थोड्या अंतरावर सर्व संत त्यांना निरोप देण्यास उभे होते. त्या वेळी सर्व साधकांनी जयघोष चालू केला. तेव्हा ‘आकाशातून सर्वांवर फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला दिसले. त्या वेळी ‘सर्व संत परात्पर गुरु डॉक्टरांशी एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच हा आनंद दिला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती मंदाकिनी चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |