भिंगार (नगर) – सध्या देशात लव्ह जिहादचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांच्याशी विवाह करून त्यांची हत्या करणे किंवा दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो. या संदर्भात प्रत्येक हिंदु मुलीने आणि आई-वडिलांनी जागृत होऊन इतरांना या जिहादपासून वाचवले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र सेनेचे भिंगार शहर प्रमुख तथा मिरवणूक उत्सव प्रमुख सतीश (नाना) मोरे यांनी केले. ते भिंगार येथील श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत बोलत होते. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा दक्षिणमुखी हनुमान मंदिर वडारवाडी भिंगार या ठिकाणाहून सायंकाळी ६ वाजता चालू झाली. या शोभायात्रेचे हे ५ वे वर्ष होते. या शोभायात्रेमध्ये ‘श्रीरामनवमी उत्सव समिती २०२३’चे प्रमुख सतीश ज्ञानेश्वर मोरे उपाख्य नाना मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विशेष
१. शोभायात्रेमध्ये वेगवेगळे झांज पथक आणि लेझीम पथक सहभागी होते. पथकाने सर्व भिंगारवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.
२. श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो, ‘हिंदु धर्माचा विजय असो’, ‘हिंदु राष्ट्राचा विजय असो’, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या.
३. उत्सव समितीच्या वतीने हिंदु जनजागृती समिती प्रकाशित ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.