कळंगुट येथे अवैध धंदे आणि वेश्याव्यवसाय चालूच ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

‘स्थानिक पोलीस निरीक्षकांना खडसावले पाहिजे’, असे मंत्री खंवटे यांचे मत

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी, २४ मार्च (वार्ता.) – सर्वाधिक अवैध धंदे कळंगुट परिसरात चालतात. कळगुंट येथे वेश्याव्यवसायही चालतो. याविषयी स्थानिक पोलीस निरीक्षकांना खडसावले पाहिजे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले आहे. (पर्यटनमंत्र्यांनी खडसवावे, जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील ! – संपादक)

काही दिवसांपूर्वी भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट परिसरात उपाहारगृहे, रेस्टॉरंट येथे खंडणी मागितली जात असल्याचा आरोप केला होता. स्वत:च्या हॉटेलमध्ये खंडणी मागितल्याविषयी त्यांनी आवाज उठवला होता; मात्र नंतर त्यांनी खंडणी प्रकरण मिटल्याचे म्हटले होते. कळंगुट आणि बागा परिसरात अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात.

संपादकीय भूमिका

हाती सत्ता असलेल्या मंत्र्यांनी केवळ माहिती न देता हे सर्व धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !